आश्रम शाळेत स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

लोहारा : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळा येथे युगपुरुष स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले हे होते. यावेळी प्रतिमापूजन ज्येष्ठ शिक्षक श्री एकनाथ निळे यांचे हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री अनिल सोमवंशी यांनी केले,तर श्री नेताजी सोमवंशी यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.आभार श्रीमती एस ए भोरे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.