महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल उत्पादनांचे एक दिवसीय विक्री व प्रदर्शन संपन्न

लोहारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,लोहारा पंचायत समिती अंतर्गत किरण महिला प्रभागसंघ माकणी यांच्यावतीने मकर संक्रांत निमित्त स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल उत्पादनांचे एक दिवसीय विक्री व प्रदर्शन संपन्न झाले.
मंगळवारी 10 जानेवारी रोजी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अलंकार बनसोडे यांच्या प्रयत्नातून माकणी येथील आठवडी बाजारात मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी बनवलेल्या वस्तूचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन माकणी येथील नवनियुक्त सरपंच सौ.स्वाती विठ्ठल साठे व उपसरपंच श्री.फुलचंद विठोबा आळंगे यांच्या हस्ते झाले.

या महोत्सवात एकुण 48645 हजार रुपये पेक्षा अधिक विक्री झाली. या महोत्सवात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड तालुका समन्वयक राहुल मोहरे उपस्थित होते.या विक्री प्रदर्शनासाठी प्रभाग समन्वयक अंतेश्वर माळी व सीआरपी अनिता तुकाराम साठे,अंजली दत्तात्रय साठे,लैला मुरमे पल्लवी औटे यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!