मनसे शेतकरी सेनेचा २६ जानेवारीला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कंदील आंदोलनचा इशारा

लोहारा : लोहारा शहरासह तालुक्यात शेतीसाठीचा कमी दाबाच्या वीज पुरवठा मुळे शेतीच्या पिकांचे नुकसान होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा २६ जानेवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कंदील आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने बुधवारी ११ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात लोहारा शहरातील वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने लोहारा शहरातील उप कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, लोहारा येथील वीज वितरण कंपनी ३३ केव्हीतुन तालुक्यातील गावांत वीज पुरवठा केला जातो.सध्या विहिरींची पाणीपातळी चांगली असल्याने रबी पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. यामुळे रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहेत. मात्र, वीज वितरण कंपनीकडून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप व्यवस्थित सुरू होत नसल्याने,विद्युत पंप जळत असल्याने पिके वाया तर जात आहेत.
तरी वीज वितरण कंपनीने योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने १६ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर कंदील आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब रवळे,तालुका उपाध्यक्ष अजय पवार यांनी दिला आहे.