कॉग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष बसवराज पाटील यांची घेतली मातोळ्याच्या नूतन सरपंच व सदस्यांनी भेट

औसा / औसा तालुक्यातील मातोळा येथील नूतन सरपंच व सदस्य यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी नुतन सरपंच गोविंद भोसले ,सदस्य संजय मोरे, अहमद सय्यद ,रमेश भोसले यांना बसवराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बापुराव वाघमोडे,गजानन स्वामी, शाम गोरे आदि उपस्थित होते.