शैक्षणिक क्रांती व दारू बंदीसाठी आम्ही कुमठेकर प्रतिष्ठानची स्थापना

अहमदपूर / लातूर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

कुमठा बु: येथे काल दिनांक 01/01/2023 रोजी नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा विडा उचललेल्या आम्ही कुमठेकर प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसंत गुळवे तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिदास तंम्मेवार होते. यावेळी हरिदास तम्मेवार यांनी गावातील दारूबंदी झालीच पाहिजे या बद्दल गावकऱ्यांना आग्रह केला. दारूचा ऊत येणे ही काही भूषणावह गोष्ट नाही.

दारूची दुकाने बंद केल्याने दारू बंद होत नाही त्यासाठी व्यक्तीच्या डोक्यातूनच दारू गेली पाहिजे असे मत बोलताना व्यक्त केले. तसेच प्रतिष्ठानच्या सभासदांनी सामाजिक कार्य करायचे असेल तर राजकीय व प्रसिद्धीच्या हव्यासाचे जोडे बाहेर काढून काम करा असे सुचविले.

तर डॉ. वसंत गुळवे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण देणे ही काळाची गरज आहे असे सांगितले.या प्रसंगी सरपंच शोभा जाधव,बालाजी भोसले, अनिल कांबळे, श्यामराव टिकोरे, माधवराव पाटील, रावसाहेब भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गुळवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आम्ही कुमठेकर प्रतिष्ठानच्या सर्वच सभासदांनी खूप कष्ट घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!