खेळ खेळूया उत्कर्षाचे ; हर्ष अन् उल्हासाचा

🏃 खेळ खेळूया उत्कर्षाचे 🏃

हर्ष अन् उल्हासाचा
रंगतो जिथे मेळ ,
खेळाडूंचा परिचय देण्या
सज्ज मैदानावरचे खेळ ;

तनांमनांत रोमांच भरतो
पाहता चुरसीची खोखो -कबड्डी,
संघ जिंकता हर्ष चर्येचा
करून जातो हळूच कुर्रघोडी ;

थाटात रंगला आखाडा
जणू कुस्त्यांचा फड ,
खेळाडू क्षणांत वाटती
चक्षूंना वरचढ ;

युक्त्यांच्या क्लृप्तीवर चाले
बुद्धीचे ते बळ,
एकाग्रतेचे दर्शन घडवते
दिमाखात बुद्धीबळ ;

खेळाडूंची प्रशंसा करूनी
प्रेक्षकच देती वाहवा !
आपलेच नेत्र घडविती
भावी खेळाडूच नवा .

            ⚫ श्रीमती मधुबाला नरेंद्र औटे ⚫                           शिक्षका,जिल्हा परीषद प्राथमिक शाळा
8975811204

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!