“माळी महासंघ” आयोजित १ जानेवारीला “फुले दांपत्य” सन्मान महारॅली

पिंपरी : (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांनी इ.स.१ जानेवारी १८४८ रोजी प्रथम मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली व स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे (शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. या निमित्ताने
फुले दांपत्याच्या या महान कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण व विकास या मागणीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावा यासाठी १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता भिडेवाडा पुणे ते महात्मा फुलेवाडा (समता भूमी) गंज पेठ सन्मान महारॅलीचे आयोजन केले आहे.
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,प्रदेश-अध्यक्ष अरुण तिखे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक काळुराम गायकवाड, राष्ट्रीय महासचिव रवींद्र अंबाडकर,प्रदेश-सरचिटणीस नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय सचिव भारत माळी, विश्वस्त वर्षा गोडे, राष्ट्रीय सहसचिव
संतोष जमदाडे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष वनिता लोंढे,महिला प्रदेशाध्यक्ष शुभांगी लोंढे,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे,प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
——
पुणे शहर कार्यकारणी माध्यमातून महारॅलीचे आयोजन
महारॅलीचे संयोजक व व्यवस्थापक पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप,महिला अध्यक्ष पुणे शहर स्मिता लडकत, ज्येष्ठ नागरिक आघाडी नानासाहेब कुदळे शारदा फरांदे,युवा कार्याध्यक्ष पुणे शहर योगेंद्र लडकत उपाध्यक्ष पुणे शहर रवी सहाणे,उपाध्यक्ष पुणे शहर सचिन शिवरकर,महिला उपाध्यक्ष पुणे शहर गायत्री लडकत, एकनाथ ढोले,बाळासाहेब लडकत, दिलीप झगडे,राजेंद्र लडकत,हरीश लडकत,बंडू कचरे,सचिन जमदाडे,अनंत शिंदे,संतोष रासकर,शामा जाधव, संगीता येवलेकर, वंदना बनकर, सीमा लडकत आरती सहाने, सुनीता कोद्रे, ज्योती लांडगे, शैलेजा बनकर, दिपाली माटे, अँड.मोनिका खलाणे,वैशाली रासकर, प्रिती म्हेत्रे, सुषमा ताम्हाणे, धनश्री गायकवाड, मनिषा पांढरे, छाया गदादे, पुष्पा लव्हे, अपर्णा धाडगे, रीमा लडकत, सिमा शिवरकर, पल्लवी गवळी आदी पुणे शहर कार्यकारणी माध्यमातून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
——
महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित भव्य दिव्य चित्ररथ
सदर रॅलीमध्ये रथावर भित्तीचित्रांद्वारे फुले दांपत्याचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित भव्य दिव्य अशा स्वरूपात चित्ररथाची मांडणी केली आहे. सोबत ढोल-पथके, लेझीम, शंखनाद, आकर्षक फुलांची सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या संपूर्ण मार्गावर अंथरण्यात येणार आहेत. झेंडे व फलक घेऊन फुले प्रेमी सहभागी असणार आहेत. मिरवणूक मार्ग भिडेवाडा (श्री.दगडूशेठ गणपती मंदिर) येथून शिवाजी रोड मार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी महाराणा प्रताप रोडने महात्मा फुलेवाडा (समता भूमी) येथे येऊन सर्व फुले प्रेमी अभिवादन करतील. शेवटी या महारॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे होईल. सदर रॅलीकरीता महाराष्ट्रातील माळी समाजातील कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी सहभागी होण्याकरीता माळी महासंघाने आवाहन केले आहे.
—–
रॅलीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
संपूर्ण महाराष्ट्रामधून सदर रॅलीला उपस्थित राहण्याकरीता माळी महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, आर डी खलाने, नामदेवराव कुकुडे, कोषाध्यक्ष डाॅ श्रीकृष्ण गोरडे, अध्यक्ष युवक आघाडी शरद पेठकर, सचिव चंद्रशेखर दरवडे, महिला आघाडी कार्याध्यक्ष संध्या गुरनुळे, अध्यक्ष वैद्यकीय आघाडी डाॅ संजय घाटे, अध्यक्ष अधिकारी आघाडी केशवराव दहिकर, अध्यक्ष सहकार आघाडी संपत बोराटे , अध्यक्ष शिक्षक आघाडी डाॅ प्रमोद तांबे, अध्यक्ष सांस्कृतिक आघाडी जगन्नाथ लडकत, अध्यक्ष किसान आघाडी शंकरराव वाघमारे, अध्यक्ष विधी आघाडी प्रकाश माळी व विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, मुकुंद पोटदुखे, राजेश जावरकर, अतुल क्षीरसागर, कांतीलाल भूमकर यांनी आवाहन केले आहे.
फुले दाम्पत्याच्या सन्मानात माळी समाज मैदानात
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ भिडेवाडा येथे यांच्या सन्मानार्थ व भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाच्या निर्माणार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘फुले दाम्पत्याच्या सन्मानात माळी समाज मैदानात’ हा नारा घेऊन या महारॅलीत महाराष्ट्रासह अन्य प्रांतातून सुमारे २० हजार समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. भिडेवाड्यापासून महारॅलीला सकाळी सुरुवात होणार असून, ढोल-ताशे, विविध देखावे व आकर्षक वेशभूषा अशा थाटात महारॅली फुलेवाडा येथे पोहचेल आणि सावित्रीबाई फुले सभागृहात महारॅलीचा समारोप होईल.