रेड झोन रद्द करावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे

पिंपरी : (प्रतिनिधी)
रावेत,किवळे,मामुर्डी परिसरातील प्रस्तावित रेड झोन रद्द करण्यात यावा यासाठी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत,किवळे,मामुर्डी हे उपनगर झपाट्याने विकसित होत असलेले शहराचे प्रवेशद्वार आहे. देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ असलेल्या उंच इमारतीवरून फॅक्टरी स्पष्टपणे दिसत असल्याने सुरक्षेला धोका असल्याचे रावेतसह, किवळे,मामुर्डी भागाचा रेड झोन क्षेत्रात समाविष्ट करावा, असे सक्त निर्देश संरक्षण विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत असे समजते. परिणामी, रावेतसह मामुर्डी व किवळे, प्राधिकरणाचा काही भाग या परिसरावर रेड झोनची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

देहूरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी तब्बल ५२८.९३एकर क्षेत्रात आहे. फॅक्टरीच्या सीमाभिंती पासून दोन हजार यार्ड म्हणजे १.८२ किलोमीटर अंतराच्या परिघात रेडझोन क्षेत्र आहे. सीमा भिंतीला लागून असलेले रावेत,किवळे,मामुर्डी परिसरात नागरी क्षेत्र विकसित झाले आहे. असंख्य व्यावसायिक व गृहनिर्माण प्रकल्पांसह सामान्य नागरिकांनी महापालिकेच्या परवानगीने आपल्या वास्तव्यासाठी घरे बांधली आहेत.रावेत सह किवळे,मामुर्डी गाव सन १९९७ ला महापालिकेत समाविष्ट झाले. त्याचा डीपी सन २००४ तयार झाला त्यानुसार महापालिकेने रावेत,किवळे,मामुर्डी परिसराचा सर्वांगीण विकास केला आहे. पालिकेने ४०० ते ५०० कोटीचा खर्च करून बीआरटी रस्ते, उड्डाणपुल व इतर नागरी सुविधा निर्माण केल्या आहेत.आमच्या माहितीनुसार ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये तयार होणारा सरंक्षण विभागाचा दारुगोळा हा कमी क्षमतेचा असतो.सदर दारुगोळा तयार झाल्यानंतर त्याची साठवणूक येथे न करता तत्काळ इच्छित स्थळी हलविला जातो. ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापन झाल्यापासून मागील ६२ वर्षात आतापर्यंत आमच्या माहितीनुसार एकही स्फोटाची घटना घडली नाही अथवा या दारूगोळ्या मुळे जीवित हानी झाली नाही असे असताना आताच नव्याने हा परिसर रेड झोन मध्ये समाविष्ट करण्याचा घाट नागरिकांसाठी अन्यायकारक आहे. या परिसराचा झपाट्याने विकास होत असताना अनेक गृहसंकुले येथे उभारली आहेत तर काही पूर्णत्वाकडे आहेत यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची जमा पुंजी एकत्रित करून राहण्यासाठी घरे घेतली आहेत.सदर परिसर नव्याने रेड झोन हद्दीत येणार अशा आशयाच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.ऑडर्नन्स फॅक्टरीच्या सीमाभिंतीपासून पालिका हद्दीतील सर्वच भागात २ हजार यार्डच्या रेड झोन जाहीर करून बांधकामांना प्रतिबंध करावा. तसे रेड झोनचे क्षेत्र, भाग व नकाशा नव्याने प्रसिद्ध करावा. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिक,पालिका प्रशासन आणि इतर प्रशासनाला विश्वासात न घेता संरक्षण विभागाच्या मनमानी निर्देशामुळे रावेतसह किवळे, मामुर्डी व प्राधिकरणाचा काही भाग रेड झोन क्षेत्रात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे येथील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. यापूर्वीच्या संरक्षण खात्याच्या निर्णयानुसार संरक्षण हद्दीपासून १० मीटर अंतरापर्यंत बांधकामे करण्यास परवानगी असल्याने पालिका प्रशासनाने अनेक गृहसंकुलाना बांधकाम परवानगी दिली आहे.आता अचानक कोणत्या शासन निर्णयानुसार रावेत आणि परिसरातील विविध भाग रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.देहूरोड परिसरात ऑर्डनन्स फॅक्टरी ६२ वर्षांपूर्वी सुरू झाली. फॅक्टरी सुरू झाली त्याच वेळी रेड झोनचा योग्य तो नकाशा का जाहीर केला नाही. रावेत, किवळे, मामुर्डी भागात लोकवस्ती वाढली आहे. नागरिकांनी पै-पै जमा करून घरे बांधली आहेत. प्रस्तावित नवीन रेड झोनला ग्रामस्थांचा विरोध असून, प्रसंगी त्या विरोधात न्यायालयात जाण्याचीही ग्रामस्थांची तयारी आहे. शरद पवार यांच्यासह मोरेश्वर भोंडवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याकडे ही निवेदनाद्वारे प्रस्तावित रेड झोन रद्द करण्याबाबत मागणी केली आहे.

🔴 रावेत, किवळे, मामुर्डी भागात लोकवस्ती वाढली आहे. नागरिकांनी पै-पै जमा करून घरे बांधली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यवधी रूपये खर्च करून मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. पालिकेने ४०० ते ५०० कोटीचा खर्च करून बीआरटी रस्ते, उड्डाणपुल व इतर नागरी सुविधा निर्माण केल्या आहेत. जागेला भाव मिळावा म्हणून शेतकर्यांनी जागा राखून ठेवल्या. आता रेड झोन टाकणार असे विविध माध्यमातून समजते ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. त्याला आमचा विरोध असून, प्रसंगी त्या विरोधात न्यायालयात जाऊ. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या वाढल्याने नागरिकांवर अन्याय न करता फॅक्टरीच इतरत्र हलवावी.

मोरेश्वर भोंडवे
नगरसेवक
पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!