राज्यस्तरीय निवास स्पर्धेत बेलवाडी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्याचे यश

उस्मानाबाद : काजवा बहुउद्देशीय संस्था अहमदनगर व बंडकरी मासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय निवास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लहान गटांमध्ये शिंदे दिपाली बाळासाहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी या मुलीचा द्वितीय क्रमांक आला होता व तसेच सहभागी विद्यार्थी श्वेता शरद भगत स्नेहल सुधीर राठोड प्रज्ञा लहु जाधव आदिती काकासाहेब वाघमारे अथर्व अमर भगत यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला काजवा बहुउद्देशीय संस्था अहमदनगर व बंडकरी मासिक यांनी विद्यार्थ्यांसाठी द्वितीय आलेल्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र रजिस्टर पेन कंपास व दप्तर व इतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वही पेन व शैक्षणिक साहित्य यांचे आज वाटप करण्यात आले. प्रवीणकुमार धांडे अध्यक्ष, रंजनाताई देशमुख उपाध्यक्ष राम लोटे सचिव व त्यांची टीम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या निबंध स्पर्धेसाठी निर्मले सुनंदा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक खिजर मोरवे अनंत कानेगावकर कलशेट्टी मल्लिकार्जुन व तसेच गावातील सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.