न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

उस्मानाबाद : आज बुधवारी लोहारा ग्रामीण रुग्णालयातील डॉ इरफान शेख त्यांचे सहकारी कर्मचारी पवार सिस्टर यांनी स्कूलमधील इयत्ता नर्सरी ते आठवी पर्यंतच्या एकूण 240 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना नाक, कान, डोळे, जीभ याची काळजी घेण्यासाठी सांगितले, विशेष करून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर रहावे कारण मोबाईलच्या अती पाहण्याने व वापराने लहान मुलांमध्ये डोळ्याचे आजार वाढत आहेत अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी या आजारावर गोळ्या व औषध दिले.
याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव,शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, प्रेमचंद राठोड, सविता जाधव, मीरा माने, माधवी होगाडे, मयुरी नारायणकर, संतोषी घंटे, शिवानी बिडवे, सरिता पवार, चांदबी चाऊस, निलोफर बागवान, स्वामींनी होंडराव आदी कर्मचारी उपस्थित होते.