अचलेर ग्रामपंचायतच्या विजयी उमेदवारांचा आमदार चौगुले यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील ग्रामपंचायतच्या विजयी उमेदवारांचा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी २४ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे,उमरगा बाजार समितीचे सभापती सुलतान सेठ,बाळासाहेबांची शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,सुभाष सोलंकर,माजी नगरसेवक अभिमान खराडे,अनिल बायस, सुनील पुजारी, हरिभाऊ पुजारी, सुरेश खंडाळकर आदी होते.