लोहारा ( जि.धाराशिव ) : मराठा योध्दा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या मान्य करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमरगा – लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.
मराठा योध्दा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कुणबी- मराठा या प्रवर्गातील लोकांच्या इतर नातलगांना या आरक्षणाचा लाभ मिळवुन देण्यासाठी २७ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने सगेसोयरे संदर्भात अधिसूचना काढली होती. परंतु या अधिसूचनेची अद्यापावेतो अंमलबजावणी होत नसलेल्या कारणाने श्री. मनोज जरांगे – पाटील हे दि.०८ जून २०२४
पासुन पुन्हा आमरण उपोषणास बसले असुन त्यांच्या या आंदोलनास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पाठींबा दर्शविला आहे. तसेच श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या त्वरीत मान्य करून त्यांचे उपोषण सोडवावे,ही विनंती आमदार चौगुले यांनी केली आहे.
Back to top button
error: Content is protected !!