लोहारा ( जि.धाराशिव ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा येथे ६ डिसेंबर रोजी आदरांजलीचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना जाधव सर म्हणाले, “ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाची निर्मिती करून त्यांनी भारताला लोकशाहीची भक्कम पायाभरणी दिली. डी.लिट, पीएच.डी., बॅरिस्टर अशा अनेक प्रतिष्ठित पदव्या प्राप्त करून त्यांनी जागतिक स्तरावर भारतीयांची ओळख उंचावली.”
या कार्यक्रमास प्राचार्य श्री शहाजी जाधव, संचालिका सौ. सविता जाधव, पालक प्रतिनिधी व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले, श्री सतिश गिरी, श्री चंदन भारती, श्री शिवा थोरात, श्री प्रवीण जाधव, श्री सिद्धेश्वर सुरवसे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन मिस मीरा माने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रमेश गिराम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे मानले.
महामानवाला वाहिलेली ही कृतज्ञ आदरांजली सर्वांच्या हृदयात प्रेरणादायी ठरली.