लोकमंगल कारखान्याचा काटा बंद करून बेमुदत उपोषण ; शेतकऱ्यांचा इशारा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, लोहारा खुर्द,खेड शिवारातील लोकमंगल माउली साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१- २०२२ या वर्षीचा बिल हप्ता जाहीर केल्यानुसार उर्वरित ५०० रुपये प्रमाणे हप्ता न काढण्यास ११ नोव्हेबर रोजी लोकमंगल कारखान्याचा काटा बंद करून बेमुदत उपोषण करण्याचा लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे.