अपर्णा सूर्यवंशी या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय वेतलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

लोहारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच क्रीडा उपसंचालक विभागीय कार्यालय लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या सयुक्त विद्यमाने रामगडिया वेटलीफ्टीग अकॅडमी नांदेड येथे झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथील बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कु अपर्णा शिवाजी सूर्यवंशी ने 19 वर्ष वयोगट व 55 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्य स्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 11 व 12 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. अपर्णाच्या यशचे प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी अभिनंदन करून कौतुक केलेव राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे व श्री नागनाथ पांढरे यांनी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी अपर्णा चा सत्कार प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी केला. अपर्णा च्या यशाने प्रेरित होऊन विद्यार्थी नी अभ्यासा बरोबर क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी केले.

याप्रसंगी प्राचार्या नी क्रीडा विभाग प्रमुख प्रा प्रशांत काळे व श्री नागनाथ पांढरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा सुनिल बहिरे, प्रा सचिन शिंदे, प्रा बालाजी सूर्यवंशी, प्रा राजेंद्र साळुंके, प्रा ज्ञानदेव शिंदे, प्रा रामचंद्र खुणे यांच्या सह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!