महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन

लोहारा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित पालक भारत विद्यालय माकणीचे माजी प्राचार्य दगडू राठोड, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य दगडू राठोड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधान दिले, त्याच्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व सामान्य माणसाला समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्य वेचले. याप्रसंगी शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमनाथ राठोड, सविता जाधव, संचीता बाचपल्ले, माधवी होगाडे, मयुरी नारायणकर, मीरा माने, संतोषी घंटे, सरिता पवार,अस्मिता देवकते यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कुसळकर यांनी केले. तर आभार शिवानी बिडवे यांनी मानले.