खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा लिंगायत समनव्य समितीच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या दहाव्या सत्राच्या हिवाळी अधिवेशनात लिंगायत समाजाच्या मागणीचा विचार करुन लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा, अशी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी केली. याबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा लिंगायत समनव्य समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे सत्कार करण्यात आला.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांची मुर्ती, पुस्तके देण्यात आली.
स्वतंत्र लिंगायत धर्म व इतर मागण्यासाठी दि.२९ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे देशव्यापी आंदोलन होणार आहे. त्यानिमित्त खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निमंत्रण ही यावेळी देण्यात आले.
यावेळी लिंगायत धर्म महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आर. एस.देशिंगे, बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर,विजय धत्तुरे,बी एस पाटील, सोमनाथ जथे ( पुणे),सचिन लवहस्ते (अहमदपूर) प्रशांत कबडगे (सांगली),सिध्देश्वर औरादे (लातुर), राधाकृष्ण पाटील (सोलापूर) सौरभ ढोले (बार्शी) लिंगायत तेली समाज संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,दिलीप तांबडे,एक के चौगुले, सिध्देश्वर पाटील कवळखेडकर (लातुर), गणेश खबोले जिल्हा मिडीया प्रमुख,शिलिंग जेवळे (औसा),जि प सदस्य महेश पाटील (औसा),बश्वेश्वर हेंगणे (लातुर), श्रीनिवास शंरकर,संतोष कुमार वतने,सुर्यकांत वाले,विरभद्र फावडे (लोहारा) काशिनाथ बळवंते (लातुर), चंद्रकांत गार्डे (उस्मानाबाद),सुधिर कुपाडे (धाराशिव), सिध्देश्वर गिराम (हिप्परगा) यांच्यासह लिंगायत समाजाचे नागिरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उस्मानाबाद शहर समनव्यक पदी रवि कोरे आळणीकर
लिंगायत समनव्य समितीच्या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी रोजी आंदोलन होणार आहे.त्यानिमित्त उस्मानाबाद येथे झालेल्या नियोजन बैठकीत आंदोलनाची तयारी बाबत बैठक झाली.या बैठकीत लिंगायत समनव्य समितीच्या उस्मानाबाद शहर समनव्यक पदी लिंगायत तेली समाज धाराशिव संघटनेचे रवि कोरे आळणीकर यांची निवड करण्यात आली.निवडी निमित्त खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सत्कार केला.