लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे ४ डिसेंबर पासुन शिवनाम सप्ताहास सुरवात

लोहारा : लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत अखंड शिवनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (लोहारा), निरंजन शिवाचार्य महाराज(औसा),डॉ.शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, गंगाधर शिवाचार्य महाराज सातलिंगस्वामी यांच्या सानिध्यात सप्ताह होईल. या सप्ताहात शिवपाठ, अभिषेक, श्री परामराहस्य पारायण, भजन, कीर्तन, शिवजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ४ डिसेंबर रोजी सकाळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते पंचाचार्य पुजन, ध्वज पुजन,विना पुजन,टाळ पुजन, मृदंग पुजन, हार्मोनियम पुजन होईल.
शिवनाम सप्ताह व्यासपीठ प्रमुख शि.भ.प. शिवलिंगप्पा केराप्पा संगशेट्टी, शि.भ.प. भागवत बेळे महाराज आहेत. माहेश्वर मंडळात पंचय्या स्वामी, संगन्ना स्वामी, रामेश्वर स्वामी, बबन स्वामी आहेत. यावेळी प्रसिध्द शिव कीर्तनकार शि.भ.प.महादेवी मठपती (ननंद), शि.भ.प.धनराज बुलबुले (सामनगाव), शि.भ.प.भाग्यश्री शेरे-पाटील (दवन हिप्परगा),शि.भ.प.लक्ष्मण विभुते (माळकुंजी), शि.भ.प.किर्तीताई हिरेमठ (लातुर),शि.भ.प.विश्वनाथ स्वामी (वडवळ), शि.भ.प.नीलकंठ विभुते(माळकुंजी) तर शेवट चे कीर्तन शि.भ.प.शि.भ.प.कुमार सागर स्वामी (लोहारा) यांचे होणार आहे.