न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये समता सप्ताह साजरा

लोहारा : लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये ३ ते ९ डिसेंबर दरम्यान समता सप्ताह साजरा केला जात आहे.
त्यानुसार शनिवारी ३ डिसेंबर रोजी दीव्यांग समान संधी हा उपक्रम साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीचा अधिकार अधिनियम २०१६ नुसार प्रत्येक शाळेतील दीव्यांग व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्कूलमधील इयत्ता तिसरी मधील दिव्यांग विद्यार्थिनी प्रणिता रमेश वाघुले हिचा आणि पालक पंचगंगा वाघुले, रमेश वाघुले यांचा स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्कुलमधील शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, प्रेमचंद राठोड, सविता जाधव, मीरा माने, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, सरिता पवार, शिवानी बिडवे, अस्मिता देवकते, चांदबी चाऊस आदी उपस्थित होते.