शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांची सोमवारी उमरग्यात जाहीर सभा 

उमरगा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या प्रा.सुषमा अंधारे यांची सोमवारी ५ डिसेंबर रोजी उमरगा येथे सभा होणार आहे.

उमरगा येथे सोमवारी सायंकाळी पाच शहरातील महामार्गालगत असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर, जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

शिवसेनेच्या वतीने राज्यभर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून रान पेटवून प्रबोधन करणाऱ्या प्रा.अंधारे या उमरगा शहरात सभा घेणार असून जुने निष्ठावंत शिवसैनिकांना तसेच शिवसेना समर्थकांना यामुळे चांगलेच बळ मिळणार आहे. त्यानेमके काय बोलणार याबाबत सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून सुषमा अंधारे यांच्या सभेसाठी निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागले असून या प्रबोधन यात्रेत तालुका व परिसरातील जनतेनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,माजी तालुका प्रमुख सुरेश वाले, विजयकुमार नागणे, भगवान जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!