फेरलिलाव आनलाईन पध्नदतीने न करता ओपन पध्दतीने करावा – खानापुरे

औसा – प्रतिनिधी
भाजी मंडई, बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलातील नगरपरिषदेने केलेल्या आनलाईन लिलावास स्थगिती देत. फेरलिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांनी दिले आहेत. पालिकेने फेरलिलाव आनलाईन पध्नदतीने न करता ओपन पध्दतीने करावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .
औसा नगरपरिषदेने बांधलेल्या गाळ्याचा आनलाईन लिलाव केला. याला जिल्हाधिकारी यांनी स्थगिती देत फेरलिलाव करण्याचे आदेश दिले. यानंतर काँग्रेसच्या वतीने शासकीय विश्रामगृहात 2 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. शाहनवाज पटेल, मुज्जमिल शेख यांची उपस्थिती होती. औशाच्या नगरपालिकेने बांधलेल्या गाळ्याचा 13 ते 23 नोव्हेंबर, 14 ते 19 फेब्रूवारी 2021 या कोरोना काळात व्यापारी, इच्छुक बेरोजगार तरूण आर्थिक अडचणीत असताना नेमके याच काळात नगरपरिषदेने आनलाईन लिलाव केला. यामुळे गरजू, बेरोजगार तरूणांना इच्छा असूनही, लिलावात सहभागी होता आले नाही. औसेकरांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतू सुनावणीच्या वेळी तत्कालिन नगरविकासमंत्री यांच्या आदेशामुळे सुनावणी थांबाविण्यात आली. म्हणुन हायकोर्टात दाद मागितली.
हायकोर्टाने आठ आठवड्याच्या आत आपल्या स्तरावर ताबडतोब निकाल द्यावा . असा जिल्हाधिकार्‍यांंना आदेश दिला. यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा सुनावणी झाली. यानंतर नगरपरिषदेला आदेश दिला.लिलावात भाग घेऊन गाळा ताब्यात घेतला आहे . पण लिलावात बोली लावलेल्या रकमेचा भरणा केला नाही. करारनामा केला नाही. अशा गाळ्यांचे फेरलिलाव करणे योग्य असल्याचे मत नोंदवले . किशोर भोसले, मुज्जमील शेख, सुनील राठोड, अमर खानापुरे यांनी दाखल केलेला अर्ज मंजुर केला. याचबरोबर बेकायदेशीर पणे ताबा असलेल्या गाळेधारकांचे गाळे तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांंना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची नगरपरिषदेने तात्काळ अमंलबजावणी करावी. नगरपालिकेने आनलाईन लिलाव न करता ओपन पध्दतीने लिलाव करावा. यामुळे नव्याने व्यवसाय उभारणार्‍या इच्छुकांना गाळे मिळतील. तर ओपन लिलावामुळे जास्ती जास्त लोकांना सहभागी होता येईल. याचा आर्थिक फायदा नगरपरिषदेला होईल असे मत खानापुरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!