जेवळीत पुन्हा एखदा नविन समिकरणे बघायला मिळणार

जेवळी जि.उस्मानाबाद (सुधीर कोरे) :

लोहारा तालुक्यात लोकसंख्यानी सर्वात मोठे व राजकीय द्रष्ट्या महत्व असलेल्या जेवळी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. येथील सरपंच पद हे यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी असून मोठी चरस निर्माण झाली आहे. यावेळी निवडणुक तिरंगी होण्याची संकेत आहे. याही वेळी स्थानिक पुढारी आपली गट- तट, पक्षभेद बाजूला सारुण एकत्र येत असून पुन्हा नविन समिकरणे बघायला मिळत आहेत.

भूकंपा नंतर जेवळी गावच जेवळी व दक्षिण जेवळी असे दोन ठिकाणी पुनर्वसन करण्यात झाले आहे. या नंतर दश्चिण जेवळीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी पुढे आल्याने परिणामी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी जेवळीपासून दक्षिण जेवळी ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. या विभाजना नंतर ही जेवळी गावची लोकसंख्याही जवळपास नऊ हजार असून मतदारांची संख्या ही ७ हजार ५५८ एवढी आहे. गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या ही १७ च राहिली आहे. आता शासनाकडून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहिर झाला असून यासाठी १८ डिसेंबरला मतदान होत आहे. येथील निवडणुकीत पैसा व प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष असते

जेवळी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला वेग घेतला आहे. यावेळी सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे. अलीकडे येथील पुढाऱ्यात स्वहित व हेवेदावे मोठ्या प्रमाणात वाढीस लागली की आहे. प्रत्येक निवडणूकीत येथील पुढाऱ्यांच्या सोयीनुसार नवीन आघाडी आणि बिघाडी पाहावयास मिळते आहे. या कुरघोडीच्या राजकारणात आता बिनविरोधची आशा साफ मावळली आहे. यावेळी येथे सरपंचासाठी बहुरंगी तर सदस्यात तिरंगी लढत होण्याची अदांज आहे. सदस्यांसाठी सक्षम उमेदवार निवडताना पॅनल प्रमुखांची दमछाक होत असून आपलाच उमेदवार हा सर्व बाजूंनी सक्षम असावा याची दक्षता पॅनल प्रमुख घेत आहेत.

🔴 जेवळी ग्रामपंचायतीचे प्रभाग आरक्षण असे – प्रभाग एकमध्ये (दोन पैकी)- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (एक), सर्वसाधारण (एक), प्रभाग दोनमध्ये (तीन पैकी)- सर्वसाधारण (एक), सर्वसाधारण महिला (दोन), प्रभाग तीन- अनुसूचित जाती (एक), सर्वसाधारण (एक), सर्वसाधारण महिला (एक), प्रभाग चार – सर्वसाधारण (एक), सर्वसाधारण महिला (दोन), प्रभागा पाच- सर्वसाधारण (एक), सर्वसाधारण महिला (दोन) प्रभाग सहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (एक), सर्वसाधारण (एक), सर्वसाधारण महिला (एक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!