घन कचरा प्रक्रिया केंद्र नगरपंचायतीच्या हद्दीतच उभा करा

लोहारा : लोहारा शहरातील घन कचरा प्रक्रिया केंद्र नगरपंचायतीच्या हद्दीतच उभा करून घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे आरपीआय आठवले गटाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
तहसिलदार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लोहारा शहरातील ओला व सुक्का कचरा प्रक्रिया केंद्र नगरपंचायतच्या हद्दीतच उभा करून विल्हेवाट लावण्यात यावी.
शहरातील कचरा इतर खेड्या गावात विल्हेवाटीसाठी नेण्यात आला तर तेथील नागरीकांना विविध रोग राईला बळी पडावे लागेल असे होऊ नये म्हणून लोहारा शहरातील कचरा नगरपंचायतच्या हद्दीतच त्याची विल्हेवाट लावण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट ) यांच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर आरपीआय आठवले गट रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, तम्मा माने ,बालाजी माटे,देविदास घाटे, कल्लाप्पा दुपारगुडे, ज्ञानेश्वर भालेराव आदीच्या सह्या आहेत.