माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीचे पाणी कमी झाल्याने विंधन विहीर (बोर) अधिग्रहण करण्यात आले होते सदरील बोर पाणी अभावी बंद पडले आहे तरी गावाला तीव्र पाणीटंचाईची समस्या भासत आहे व गावामध्ये जवळपास दोन कि. मी. पर्यंत पाण्याचे स्त्रोत बंद पडले असून तसेच पाच कि. मी. परिसरात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही तरी गावाची लोकसंख्या 3560 जनावरांची संख्या 1720 असून त्याकरिता गावाला 14 लाख 1200 लिटर पाण्याची आवश्यकता असून

माकणी प्रकल्पातून पाण्याचे टँकर्स तातडीने पुरविण्यात यावे जेणेकरून पाणीटंचाईवर मात करण्यात येईल गावातील नागरिक खूप परेशान असून ते दिनांक 9/2/ 2024 रोजी तहसील कार्यालय येथे घागर मोर्चा काढणार आहेत असे ग्रामपंचायतने निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना कळवण्यात आले.निवेदनावर सरपंच व सदस्य यांच्या सह्या आहेत. या वेळी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव गोपाळ माने व सोसायटीचे चेअरमन मुरलीधर पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!