नारंगवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जगताप यांचा सत्कार

उमरगा (जि.धाराशिव) : नारंगवाडी सह 17 महसूल मंडळाचा 25% अग्रीम रक्कम देण्याच्या यादीत समावेश झाल्याने ज्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होणार होते. तेथे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी धाराशिव जिल्हा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्तीची घट येणार असल्याने पिक विमा शासन निर्णय नुसार जिल्हाधिकारी यांनी त्यानुसार जिल्ह्यातील 57 पैकी 40 महसूल मंडळांना 1 सप्टेंबर रोजी सूचना काढून 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत कंपनीला आदेशित केले होते.
मात्र उर्वरित सतरा महसूल मंडळाचा त्या यादीत समावेश नव्हता त्यामुळे व तसेच जिल्हाधिकारी यांनी अपर मुख्य सचिव यांना 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या अहवालानुसार त्याही महसूल मंडळात 60 टक्के पेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याचे सांगितले होते.
त्यानंतर अनिल जगताप यांनी पाच सप्टेंबर रोजी राज्याची मुख्य अनुप कुमार यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा संदर्भात उर्वरित महसूल मंडळांनाही 25 रक्कम देण्याची विनंती केली होती मात्र शासकीय स्तरावर काही हालचाली होत नव्हत्या.
त्यानंतर अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबर रोजी नारंगवाडी महसूल मंडळातील 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 18 सप्टेंबर रोजी रस्ता रोको करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी उमरगा ,तहसीलदार उमरगा, पोलीस उमरगा यांना निवेदनाद्वारे कळवले होते.
तातडीने 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक झाली व 15 सप्टेंबर पर्यंत च्या सतरा महसूल मंडळात तीन सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले होते.
15 सप्टेंबर रोजी अहवाल सादर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उर्वरित 17 महसूल मंडळांना पंचवीस टक्के आगरी म रक्कम मंजूर केल्याची अधिसूचना १८ सप्टेंबर रोजी काढली व त्याची माहिती सकाळी नऊ वाजता आंदोलन स्थळी शेतकऱ्यांना देण्यात आली.
नारंगवाडी सह 17 महसूल मंडळाचा 25% अग्रीम देण्याच्या यादीत समावेश झाल्याने आंदोलन स्थळी जमलेल्या शेतकऱ्यांनी श्री अनिल जगताप य यांचा त्या ठिकाणी सत्कार केला.