राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बेलवाडीच्या विद्यार्थीनीने पटकावला व्दितीय क्रमांक

लोहारा ( उस्मानाबाद ) : काजवा बहुउद्देशीय संस्था अहमदनगर व बंडकरी मासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटामध्ये लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिपाली बाळासाहेब शिंदे या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. काजवा बहुउद्देशीय संस्था व बनकर मासिक अहमदनगर, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक आनंद कानेगावकर, मोरवे खिजर, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मले यांनी अभिनंदन केले आहे.