लोहारा शहरात शेरे-ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा शहरात शेरे-ए हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती रविवारी २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी चार वाजता शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
लोहारा शहरातील आझाद चौकात जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश नलावडे यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख,शब्बीर गवंडी, नगरसेवक अमीन सुंबेकर,आरिफ खानापुरे,प्रशांत कळे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे,शाम नारायणकर,उज्ज्वला गाटे, महेबूब फकीर, जावेद जेवळे, सतिश गिरी, विजय फावडे, संतोष फावडे,समीर शेख,
जनक कोकणे, टिपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफ सुंबेकार , मुस्तफा बागवान ,अजीम बागवान, फेरोज शेख, आयुब पठाण, अल्ताफ फकीर, बिलाल गवंडी, नवेद खानापूरे, सारफराज सिद्धकी, बबलू बागवान, सोहेल सय्यद, उज्वल घाटे, अय्यज सवर, जावेद भोंगळे, वशीम शेख, खासीम मुल्ला, इम्रान शेख, रहीम जेवळे यांच्या आदी उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांना मसाला दुधाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.