औसा तालुक्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 14 कोटी मंजूर – खा. निंबाळकर


औसा / रमेश शिंदे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रस्यांा ची दर्जोन्नती करणेसाठी 1. राष्ट्रीय मार्ग 361 याकतपूर-जयनगर-किनीथेट ते तालुका हद्द (लांबी 1.6 किमी) करीता 1 कोटी 8 लक्ष तसेच 2. राममा – 361 वानवडा –मसलगा-माळकोंडजी ते संक्राळ रस्ता (12.2 किमी) करीता 7 कोटी 74 लक्ष रुपये चा निधी तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. – 2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) (DPC) मधून 3. राममा 558 लोदगा-गोंद्री-हसेगाव-हिप्परसोगा ते कातपुर तालुका सरहद्द (7.25 किमी) या रस्त्याच्या दर्जोन्नतीकरीता 5 कोटी 23 लक्ष एवढा निधी दि. 03 मार्च 2023 रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दी माध्यमातून माहिती दिली.
औसा तालुक्यातील रस्यार च्या दर्जोन्नती व दुरुस्ती करीता 14 कोटी 5 लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. औसा तालुक्यातील या भागातील चांगल्या रस्त्याअभवी नागरिकांची होणारी हाल अपेष्ठा कमी होण्याबरोबरच नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रवास सुखकर होणार आहे. याबद्दल या तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!