भाजपा महिला मोर्चा आघाडी लोहारा तालुका उपाध्यक्षाची निवड 

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील कुसुम रामदास पोतदार व तालुक्यातील कास्ती बु.येथील मंगल विष्णु समदाळे यांची भाजपा महिला मोर्चा आघाडी लोहारा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

धाराशिव येधील भाजप प्रतिष्ठान भवन येथे भाजपा नेत्या लेडीज क्लब अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी जि.प.माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला मोर्चा आघाडी लोहारा तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका आरती सतिश गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर,‌ सचिन कोळी, सोनाली सातपुते, श्रावणी थोरात, नंदा रोडगे, शोभा कडवे, मयुरी हजारे, पुनम देडे, संतोष माळवदकर, विष्णु समदाळे कास्ती बु, योगेश बाभळे, शिवा थोरात, विशाल रोडगे, स्वप्नील नारायणकर, दत्ता कोकणे, महादेव गाडगे, गौरव गोसावी, सागर गिरी, यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!