गणेश मुर्ती विसर्जनासाठी पोलीसाचा चोख बंदोबस्त राहणार – पो. नि. अजित चिंतले

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील घरगुती गणेश मुर्ती व सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन गुरुवारी होणार असून मिरवणूकी दरम्यान लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त जोख ठेवण्यात येणार आहे.
लोहारा शहरातील गणेश मुर्ती विसर्जनासाठी 3 अधिकारी, 25 कर्मचारी, 35 होमगार्ड व 2 जीप असा बंदोबस्त राहणार आहे.हा बंदोबस्त विसर्जन मिरवणूक बंद होईपर्यत असणार आहे. विसर्जन मिरवणूक दरम्यान कोणीही डीजे लावू नये व ठरवून दिलेल्या मार्गाने विसर्जन मिरवणूक करावी विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा. असे अवाहन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी केले आहे. लोहारा पोलीस ठाण्यातंर्गत गावातील मिरवणूकीसाठी ही बंदोबस्त लावण्यात आला आहे.