लोहारा शहरातील गणेश मुर्ती विसर्जन या तीन ठिकाणी होणार ; नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी पुर्ण

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील घरगुती गणेश मुर्ती व सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जनाची तयारी लोहारा नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली.
लोहारा नगरपंचायत प्रशासनाने गणेश मुर्ती विसर्जनसाठी तीन ठिकाण निश्चित केले आहेत. त्यात गाव तलावात लहन गणेश मंडळाच्या व घरगुती गणेश मुर्ती विसर्जन, शहरालगत असलेल्या मोघा साठवण तलावात मध्यम स्वरुपाचे गणेशमुर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत.
तर मोठ्या गणेश मुर्तीचे विसर्जन हे माकणी निम्न तेरणा प्रकल्पात विसर्जन केल्या जाणार आहेत. तीन्ही ठिकाणी रस्ता,वीजेची सोय करण्यात आली असल्याची माहीती लोहारी नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोडगे यांनी दिली आहे.