धाराशिव

प्रांजली १ ग्राम ज्वेलरीच्या भव्य उद्घाटनास मान्यवरांची उपस्थिती; शुभेच्छांचा वर्षाव

लोहारा, जि. धाराशिव (प्रतिनिधी) :
लोहारा शहरात नव्याने सुरू झालेल्या ‘प्रांजली १ ग्राम ज्वेलरी’ या दालनाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी नवीन व्यावसायिक उपक्रमास शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.

या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मा. सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी दालनाला भेट देत व्यवसायाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्थानिक व्यापार क्षेत्रात दर्जेदार सेवा व ग्राहकांचा विश्वास संपादन करून ‘प्रांजली १ ग्राम ज्वेलरी’ निश्चितच वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सुनील आबा साळुंखे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), अहमद शेख, बाळासाहेब पाटील, बाबा शेख, वैजनाथ कागे, डॉ. हेमंत श्रीगिरे, अमोल बिराजदार आणि नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, व्यापारी, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपस्थितांनी दालनातील आकर्षक दागिन्यांच्या संग्रहाचे कौतुक केले. आधुनिक डिझाईन्स, ग्राहकाभिमुख सेवा आणि विश्वासार्ह व्यवहाराच्या बळावर हा व्यवसाय यशस्वी वाटचाल करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, मित्रपरिवार, ग्राहक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. “आपल्या प्रेमळ उपस्थितीमुळे आणि शुभेच्छांमुळे आम्हाला नव्या व्यवसायाची प्रेरणा व आत्मविश्वास मिळाला आहे. भविष्यातही आपल्या विश्वासास पात्र राहून उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!