लोहारा शहरात एका हॉटेल चालकास व त्याच्या भावास मारहाण ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उस्मानाबाद : पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, लोहारा येथील- महोदव विजय गोरे हे 9 नोव्हेबर रोजी 6:30 वा. सु. लोहारा येथील आपल्या हॉटेलमध्ये असताना गावातीलच- अफजल पठाण, शहबाज हेड्डे यांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी तेथे जाउन महादेव गोरे यांना चहा मागितला. यावर गोरे यांनी पुर्वीच्या चहाचे पैसे मागीतले असता नमूद लोकांनी हॉटेलातील चहाची कॅटली बाहेर फेकून आतील साहित्याची तोडफोड केली. तसेच गोरे यांसह त्यांचा भाऊ- भागवत यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन हॉटेल चालवायचे असल्यास तीस हजार रुपयाची मागणी करुन ते न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांनी 11 नोव्हेबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 324, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!