धाराशिवमहाराष्ट्रराजकीय

भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडून बसवराज पाटील यांचा सत्कार; विजयासाठी दिल्या शुभेच्छा

लोहारा : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले बसवराज पाटील यांनी शुक्रवारी भाजप नेत्या तथा मंत्री पंकजाताई मुंडे  यांच्या परळी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी पंकजाताई मुंडे यांनी बसवराज पाटील यांचा सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या उमेदवारीबाबत समाधान व्यक्त करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान विविध सामाजिक, राजकीय तसेच विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

 

HTML img Tag Simply Easy Learning

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विकासकामे, संघटनात्मक बळकटी आणि आगामी निवडणुकीची रणनीती यावरही विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे, परळी तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, नगरपरिषद गटनेते पवन मुंडे, दत्तप्पा इटगे गुरुजी, श्रीराम मुंडे, नीलकंठ साठे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या उमेदवाराला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या पाठबळामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!