बेलवाडीचे सहा विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती परीक्षेत

लोहारा : लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवित यश संपादन केले असून १० पैकी ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले.
बेडवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत रंगरंगोटी,कार्यालयीन ठेवण, उपस्थिती विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेने केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी व नव नवीन उपक्रम राबविणारी शाळा म्हणून सर्वत्र परीचयीत आहे.
त्यात शाळेची गुणवत्ता कायम ठेवण्यात शिक्षकांना यश आले आहे. शाळेचे सन २०१९ ला ४ विद्यार्थी,२०२१ ला १ विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले होते. त्यातही या वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत १० पैकी पाचवी वर्गातील पार्थ कलशेट्टी (गुण २१६), प्रज्ञा जाधव (२०४), संध्या जाधव (१९२), दिपाली शिंदे (१६२ ), स्नेहल राठोड (१५४ ), आदित्य पवार (१५४) हे ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.
या विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक पी. जी. सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, खिजर मोरवे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मले यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्याचे केंद्र प्रमुख मोहन शेवाळे, सरपंच सुधाराणी दादा पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लव्हू जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.