कृषी विभागामार्फत आष्टा कासार येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारणी 

लोहारा : लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे कृषी विभागाच्या वतीने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. माननीय तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग,मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर रीतापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. मागील काही काळापासून कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधाऱ्याची संकल्पना राबवण्यात आली होती या योजनेमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा तसेच या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवले जाणार असून शेतकऱ्यांना सिंचन स्त्रोताचा फायदा होणार आहे. तेव्हा आष्टा कासार येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी येथे श्रमदानातून वनराई बंधारे उभारणी केली.

HTML img Tag Simply Easy Learning

सरपंच सुलभा कांबळे,ग्रामसेवक मातोळे साहेब, माजी उपसरपंच गंगाधर बलसुरे,ग्रामपंचायत सदस्य चत्रभुज कागे, अमोल सोमवंशी, कृषी सेवा केंद्र दुकानदार मुकेश मुळे, प्रदीप पाटील,विजय टिकंबरे, ॲड.सयाजी शिंदे, मकबुल शेख, अनील अल्लिसे,ग्रामपंचायत शिपाई नागनाथ बबले, खंडू माने, दशरथ व कृषि सहाय्यक सचिन पवार, कृषि मित्र जिनेंद्र कासार,अमोल बलसुरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!