धाराशिव
सेवानिवृत्त शिक्षकांनी महिलांसाठी घेतला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

लोहारा ( धाराशिव ) :- सेवानिवृत्त बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार या संस्थेतर्फे दि. 26 जानेवारी 2025 रोजी दत्त मंदिर येथे बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर च्या सौजन्याने लेकीच्या नावे वृक्षारोपण व वैद्या सौ. मेघाताई वनारोटे आयुर्वेदाचार्य यांचे आरोग्यासह सौंदर्य सोहळा या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन पार पडले.
मुली, स्त्रिया आज काल वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधने हे शरीरास अपायकारक आहे.व दररोजचे आहार कसे,कोणते व केव्हा घ्यावे यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. सौंदर्य प्रसाधनेचा दुरुपयोग त्याचा होत असलेला विपर्यास यावर महिलांना सुंदर व सविस्तर असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रु.रा. कोरे सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव या होत्या. कोरे आयुक्त मॅडम यांनी ही स्त्रियांच्या विविध समस्या वर मार्गदर्शन केले. यावेळी श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष सर्जे सर हजर होते तसेच आष्टा कासार च्या पोलीस पाटील सौ. संजीवनी व्यंकट चौधरी, सौ. शीलाताई शिवाजी खडबडे, सौ.मंगल बाबुराव माळी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व श्री दत्तात्रयाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बहुसंख्य गावातील महिला, सर्व अंगणवाडी ताई व आशा कार्यकर्त्यां या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या.




