मुंबई, 21 नोव्हेंबर 2025 – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे यांनी अधिकृत नियुक्तिपत्र जारी करून प्रकाश शंकरराव होडराव यांची लोहरा युवक काँग्रेसचे शहराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.
नियुक्तिपत्रात मोरे यांनी नमूद केले आहे की, “प्रकाश होनराव यांनी युवक काँग्रेसच्या विविध उपक्रमांमध्ये दाखविलेल्या कार्यकुशल नेतृत्वगुणांची आणि संघटनक्षमताेची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात येत आहे.”
पक्षाच्या धोरणे व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी होडराव यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात बळकटी येईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
नवीन शहराध्यक्ष म्हणून प्रकाश होडराव यांना प्रदेश युवक काँग्रेसकडून शुभेच्छा देत, पक्षबांधणीसाठी सर्वोत्तम कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.