धाराशिव

लोहारा : ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आधुनिक लहुजी सेना आक्रमक ; लोहारा बंदची हाक

लोहारा : मालेगाव येथील अवघ्या ३ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येचा तीव्र संताप व्यक्त करत आधुनिक लहुजी सेना आक्रमक झाली असून या प्रकरणातील आरोपीला अतिशय कमी कालावधीत कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. समाजातील विकृत प्रवृत्तीच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेनंतर केवळ निषेध वा मेणबत्ती मोर्चाने काहीही साध्य होणार नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

 

या भयानक प्रकरणातील आरोपीवर फास्ट-ट्रॅक न्यायालयात ३० दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी कठोर मागणी आधुनिक लहुजी सेना यांनी केली आहे. “आरोपीला फाशी — हीच त्या चिमुरडीला खरी श्रद्धांजली,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला—“एका रात्रीत सरकार पडते, एका रात्रीत आमदार गुवाहाटीत जाऊन नवीन सत्ता स्थापन होते, पहाटे विधानभवन उघडून शपथविधी शक्य होतो… मग बलात्काऱ्यांना एका रात्रीत फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल का करता येऊ नये?” अशा शब्दांत शासनाच्या धीम्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या मागण्यांसाठी दि. २२ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी लोहारा शहर बंद ठेवण्याचे आवाहन आधुनिक लहुजी सेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शांततापूर्ण लोहारा बंदला साथ देऊन चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी दबाव निर्माण करावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकातून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!