लोहारा तालुका जुकटा संघटनेच्या अध्यक्षापदी प्रा. काळे व सचिवपदी प्रा. शिंदे यांची निवड

उस्मानाबाद : लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे झालेल्या लोहारा तालुका कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध प्रा. प्रशांत काळे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी प्रा शंकर शिंदे एकमताने निवड झाली.

HTML img Tag Simply Easy Learning

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा सुनिल बहिरे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी प्रा राजेंद्र साळुंके होते तर निरीक्षक तथा प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रशांत भागवत उपस्थित होते.यावेळी निरीक्षक प्रशांत भागवत यांचे स्वागत प्रा ज्ञानदेव शिंदे यांनी केले तर प्रा शंकर शिंदे यांचे स्वागत प्रा विजय उंबरे यांनी केले. अध्यक्ष व सचिव पदासाठी सूचक म्हणून प्रा लक्ष्मीकांत कुलकर्णी होते तर निवडीसाठी सर्वानी अनुमोदन दिले.तसेच आभार प्रा सुनिल बहिरे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापकानी नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांना शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी बिनविरोध लोहारा तालुळा जुकटा अध्यक्ष प्रा प्रशांत काळे व सचिव प्रा शंकर शिंदे यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!