भातागळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

लोहारा : लोहारा तालुक्यातील भातागळी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
भातागळी येथे यावर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने भव्य अशा खुल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा शालेय मुला-मुलींच्या घेण्यात आल्या होत्या तसेच मोठ्या प्रमाणामध्ये तालुकास्तरीय नृत्य स्पर्धाही घेण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन जळकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयसिंह जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण अधिकारी भास्कर शंकरराव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार काष्टी तालुका क्रीडा सचिव मुकेश सोमवंशी, गोपाल सुतार आदी उपस्थित होते.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुले प्रथम क्रमांक कानेगाव जिल्हा परिषद यांनी पटकावला त्यांना ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक जेवळी बसवेश्वर महाविद्यालय यांनी पटकावला त्यांना तीन हजार एक रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक कानेगाव जिल्हा परिषद शाळेने पटवला पटकावला त्यांना प्रथम पारितोषिक ५००१ रुपये देण्यात आले. तर द्वितीय पारितोषक ३००१ रुपये आष्टाकासार हायस्कूल आष्टाकासार यांना तीन हजार एक रुपये देण्यात आले.
तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत अंकिता अमोल आनंदगावकर हिने प्रथम पारितोषक तर शुभांगी पद्माकर जगताप हिने द्वितीय पारितोषक देण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल पाटील, दिगंबर आनंदगावकर, धनंजय जगताप, हरिप्रसाद जगताप, अभिषेक जगताप, सुरज चव्हाण, केशव जगताप,शिवप्रसाद जगताप, संतोष जगताप, सचिन लोटकर, आकाश जगताप , बंडू अभंगराव , श्रीकांत गिरी, संतोष जगताप ,आदेश जगताप ,रोहन जगताप ,सुरेश जगताप, स्वप्नील जगताप ,बालाजी गिरी आदींनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!