आष्टा (कासार) येथे बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या नामफलकाचे अनावरण

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) येथे बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच च्या नामफलकाचे अनावरण व नूतन कार्यकरिणीची निवड यावेळी करण्यात आली.
बाराव्या शतकात लोकशाहीचे जनक विश्व गुरु महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. आज या लिंगायत धर्माचे भारतात जवळपास आठ कोटी अनुयायी आहेत. गेली साठ वर्षांपासून लिंगायत स्वतंत्र धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी संघर्ष करीत आहे.जनगणनेत लिंगायत धर्माला स्वतंत्र कॉलम देण्यात यावा, ही मागणी करण्यात येत आहे. तर संघटन मजबूत करून स्वतंत्र धर्म मान्यता मिळविण्यासाठी गावोगावी बसव ब्रिगेड च्या शाखेचे उदघाटन होत आहे.त्यानिमित्त लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच च्या नामफलकाचे उदघाटन बसव ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष परमेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष भिमाशंकर व्हनाजे,गजेंद्र सुतार,जिल्हा मीडिया प्रमुख गणेश खबोले,अनिकेत पाटील,विकास चिंचोले,अनिकेत पाटील,राहुल लामाजाने,व्यंकट मिटकरी,शिवा टिकाबारे,विकास चिंचोले,वैभव जेकेकुरे,धीरज चौधरी,रवी स्वामी,अविनाश बलसुरे,संदीप पाटील,गणेश वाकडे,पंकज आळंगे,कमलाकर शिदोरे,वैजीनाथ शिदोरे,महेश बलसुरे,श्रीकांत स्वामी,सागर अल्लीशे,गुंडूशा फुंडीफलले,सागर टिकांबरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.