धाराशिवशैक्षणिक

150 वी जयंती… जनजाती गौरव दिन… आणि जिजाऊ महाविद्यालयात घडले काही खास!

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आज असा कार्यक्रम रंगला की विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पाहुणेही भारावून गेले… कारण प्रसंग होता क्रांतीचे प्रतीक, आदिवासींचे प्रेरणास्थान – भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचा!

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अनुष्का देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. सभागृहात शांतता… आणि एका प्रश्नाची उत्सुकता —

“बिरसा मुंडा कोण? त्यांचा लढा एवढा महान का?”

आणि नेमके याच क्षणी मंचावर उभे राहिले प्रा. यशवंत चंदनशिवे!
त्यांनी बिरसा मुंडांच्या जीवनातील संघर्ष, ब्रिटिशांविरुद्धचा बंड, जंगल-पाणी-जमिनीसाठीचा रणसंग्राम, आणि “उलगुलान” या ऐतिहासिक आंदोलनाचा थरार विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत केला.

सभागृहातील वातावरण क्षणाक्षणाला बदलत होते —
कधी टाळ्यांचा कडकडाट,
कधी प्रेरणेची लहर,
कधी डोळ्यात चमक…

यानंतर सीना केशव सूर्यवंशी आणि किरण चिचोळे या विद्यार्थ्यांनी प्रेरक मनोगते सादर केली. त्यांच्या आवाजात एकच संदेश —

“अत्याचाराला झुकायचं नाही… लढायचं!”

समारोपात प्राचार्या अनुष्का देसाई यांनी एक अशी घोषणा केली की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या —
“या जयंती वर्षात महाविद्यालयात विविध उपक्रमांची मालिका राबवली जाणार आहे!”

आणि त्यावर टाळ्यांचा जल्लोष…

दरम्यान आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अनपेक्षित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद!
शेवटी, कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार किरण चिचोळे यांनी केले.

या सर्व कार्यक्रमामागे भूमिका निभावणारे नायकही तितकेच महत्त्वाचे —
सौ. ईश्वरी जमादार, वैष्णवी सुतार, सौ. राणी माटे, सोनू जाधव, राधा कुंभार, प्राजक्ता गिराम, दिव्या बनसोडे यांनी परिश्रमाची वीट वीट रचत कार्यक्रम दमदार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!