लोहारा शहराच्या विकासासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर – आमदार ज्ञानराज चौगुले 

लोहारा / उमरगा : लोहारा शहरातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडुन ५ कोटी रू. निधी मंजुर झाल्याची माहिती आ.ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

    सदर कामांना मंजुरी मिळण्यासाठी ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करीत होते. यामध्ये अंतर्गत रस्ते, गटारी, सभागृह, दिवाबत्तीविषयक, संरक्षक भिंत, सभामंडप, जलशुध्दीकरण यंत्र आदी कामांचा समावेश आहे.

यानुसार

1) लोहारा शहरात चर्मकार समाज स्मशानभुमी विकसीत करणे व अनुषंगीक कामे करणे – 40 लक्ष रू.

2) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.०७ मध्ये अंतर्गत पथदिवे बसवणे व विद्युत अनुषंगीक कामे करणे – २५ लक्ष रू.

3) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.८ मध्ये अंतर्गत पथदिवे बसवणे व विद्युत अनुषंगीक कामे करणे – २५ लक्ष रू.

4) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.१० मध्ये अंतर्गत पथदिवे बसवणे व विद्युत अनुषंगीक कामे करणे – २५ लक्ष रू.

5) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.०९ मध्ये रजिस्ट्री कार्यालय ते जुना उंडरगाव रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे – २५ लक्ष रू.

6) नगर पंचायत लोहारा बु. मोमीन कब्रस्तान येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे – ५० लक्ष रू.

7) नगर पंचायत लोहारा बु. अंतर्गत जामा मस्जीद येथे सभागृह बांधकाम करणे व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे – ५० लक्ष रू.

8) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.५ मध्ये सिमेंट रस्ता व नाली करणे – १० लक्ष रू.

9) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.१६ मध्ये मध्ये पाण्याचा RO प्लांट बसविणे – २० लक्ष रू.

10) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.१६ मध्ये मध्ये नवीन नगर पंचायत कार्यालय ते महमूद फुटानकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे – ५ लक्ष रू.

11) नगरपंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.२ मध्ये बौध्द विहार बांधकाम करणे – ४० लक्ष रू.

12) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.११ मध्ये मारूती मंदिर जवळ नपाच्या जागेत सभागृह बांधकाम करणे व अनुषंगिक कामे करणे – ३० लक्ष रू.

13) नगर पंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.१७ मध्ये नपाच्या जागेत सभागृह व अनुषंगिक कामे करणे – ३० लक्ष रू.

14) नगरपंचायत लोहारा बु. प्रभाग क्र.६ मध्ये सुरेखा जटटे घर ते उमाशंकर जटटे घर, मोहन पोतदार ते डॉ.वाघमोडे घरापर्यंत पथदिवे बसविणे – १० लक्ष रू.

15) लोहारा शहरातील शेंद्रीबुवा मठ येथे नपाच्या जागेत संरक्षक भिंत व परिसर विकास करणे – २५ लक्ष रू.

16) लोहारा शहरातील महादेव मंदिर येथे सभामंडप व परिसर विकास अनुषंगीक कामे करणे – ३० लक्ष रू.

17) लोहारा शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू.

18) लोहारा शहरातील प्रभाग क्र.१२ मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू.

19) लोहारा शहरातील प्रभाग क्र.१३ मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू.

20) लोहारा शहरातील प्रभाग क्र.१४ मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू

21) लोहारा शहरातील प्रभाग क्र.१५ मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू.

22) लोहारा शहरातील प्रभाग क्र.4 मध्ये पथदिवे बसवणे – १० लक्ष रू.

या कामांना मंजुरी मिळाली असुन याबददल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!