शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा (जि.धाराशिव ) :  लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील रजिस्ट्री ऑफिस कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कदम कॉम्प्लेक्स येथे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी परिवाराकडून सुरू करण्यात आलेल्या शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ सोमवारी (दि.१) जानेवारीला नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व शिवसेना (ठाकरे गट) लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.  यावेळी शिवन्या या नुतन दालनाच्या माध्यमातून शाळेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या लेडीज वेअर, सर्व प्रकारचे फॅन्सी कुर्ती, टी शर्ट,  वेस्टर्न टॉप, जिन्स लेगिन्स, प्लाजो, दुपट्टा, व यासह आदी कपडे मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे या दालनाचा शुभारंभ होताच ग्राहकांनी दुकानास भेट देऊन खरेदी करीत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्वामी परिवाराकडून सांगण्यात आले.   

यावेळी माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, बबन स्वामी, बिटू स्वामी, मल्लिनाथ स्वामी, दयानंद स्वामी, शिवण काडगावे, श्री. बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, आप्पू स्वामी, प्रेम लांडगे, प्रवीण स्वामी, सचिन स्वामी, संदीप घोडके, प्रणिकेत स्वामी, शिवन्या लेडीज वेअरच्या प्रो.प्रा. शैलजा आप्पू स्वामी, ऋतुजा प्रवीण स्वामी, अनुजा सचिन स्वामी, निर्मला बबन स्वामी, राजकुमार स्वामी, पवन स्वामी,प्रशांत थोरात, प्रशांत माळवदकर, आकाश पवार, यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!