लोहारा : सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी वडगांववाडी (ता. लोहारा) येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘सेवा पंधरवडा अभियान’ राबविण्यात आले. स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान (SNSPA) तसेच पोषण आहार (ICDS) या उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये जिल्हा कुष्ठरोग निदान विभागाचे साळुंके सर, जिल्हा क्षयरोग निदान विभागाचे ढगे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळीचे वैद्यकीय अधिकारी अजय रणखांब सर, वेदपाठक सर, कोळी सर, सूर्यवंशी सर, शेख सर, वंदना जाधव मॅडम, जगताप मॅडम, गायकवाड मॅडम, जटाळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत, शाळा व स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही उत्साहाने सहभाग घेतला.
ग्रामसेवक आशिष गोरे, उपसरपंच अंकुश भुजबळ, माजी सरपंच वनमाला भुजबळ, पोलीस पाटील सहदेव गिराम, शालेय शिक्षण समिती अध्यक्षा उज्वला बचाटे यांच्यासह जि. प. शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला प्रवर्तक, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
शिबिरामध्ये एकूण १५१ नागरिकांची बीपी, शुगर, एच.बी., रक्त, लघवी आदी तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.