लोहारा : लोहारा शहरातील सर्वात जुने व परंपरागत जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. मंडळ सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा नगरसेवक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीत श्रीकांत तिगाडे यांची अध्यक्षपदी, रमेश उमाकांत होंडराव यांची उपाध्यक्षपदी, रोहित विरुधे यांची सचिवपदी, नितीन खंडू वाघे यांची कार्याध्यक्षपदी, सागर रेणके यांची मीडिया प्रमुख पदी तर मशाल प्रमुख म्हणून महेश कुंभार व प्रतीक विरुधे यांची निवड करण्यात आली.
नवरात्र उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती व मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक उपक्रम पार पाडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रसाद स्वरूपात देण्यात येणाऱ्या अल्पोपहाराचे नियोजन मंडळाच्या सदस्यांतून करण्याचे ठरले.
या बैठकीला श्रीशैल्य स्वामी, सुनिल देशमाने, विजय महानूर, सुनील ठेले, प्रशांत जाधव, बाळू माळी, आकाश विरुधे, प्रशांत रेणके, मुकुंद पवार, प्रेम लांडगे, बाळू माशाळकर, अनिल ठेले, बालाजी माशाळकर, पवन बुलबुले यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.