लोहारा (जि. धाराशिव) – ग्रामीण विकास संस्था संचलित व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर) संलग्न जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालय, लोहारा येथे ७७वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा. सौ. निर्मलताई नेताजी गोरे यांच्या शुभहस्ते दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रा. अनुष्का देसाई, प्रा. यशवंत चंदनशिवे, वैष्णवी लोहार, श्री. विलास बाबळे, बिसमिल्लाबी शेख यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.