धाराशिवसामाजिक

ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचा अनोखा उपक्रम — शेतकरी भगिनींसोबत भाऊबीज साजरी

 

लोहारा (प्रतिनिधी): सणांचा उत्साह सर्वत्र दिसत असला तरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांवर या वर्षीची दिवाळी काहीशी म्लान झाली आहे. या परिस्थितीत समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनने राबवला.

होळी येथील शेतकरी महिलांसोबत भाऊबीज साजरी करून फाउंडेशनच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. या वेळी फाउंडेशनच्या भावांनी शेतकरी भगिनींना वस्त्र भेट देत त्यांच्या हातून आशीर्वाद घेतला.

“कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचे बळ या भगिनींच्या आशीर्वादातूनच मिळते. समाजाच्या आधारानेच सामाजिक कार्याला अर्थ प्राप्त होतो,” अशी भावना ॲड. शीतल चव्हाण यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला फाउंडेशनचे सत्यनारायण जाधव, ईश्वर नांगरे, करीम शेख, प्रदीप चौधरी, करण बाबळसूरे, किशोर बसगुंडे, विजय चितली यांसह शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 शेतकरी समाजाच्या भावविश्वाला स्पर्श करणारा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!