धाराशिवराजकीय

जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी आज मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवगिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक चळवळीत सक्रिय असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारा आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनामध्ये त्यांचा ठसा असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जात आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning

या प्रवेश प्रसंगी शाम पवार, राज अहमद पठाण, बाळकृष्ण घोडके-पाटील, जगन्नाथ गवळी, डॉ. जितेंद्र कानडे, कृष्णात मोरे, सुनिल जाधव, अनिल छत्रे, संजय भोसले, सतिश पिसे, मुर्टा (उपसरपंच) गोपाळ सुरवसे यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवगिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी भक्कम झाल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!